तुझ्या आलो मी चरणावरी
मोरया माझ्या मोरया
मोरया माझ्या मोरया
माझ्या देवा तुझी र कीर्ती न्यारी
दुष्टांचा तु सौहारी
तूच साऱ्या सृष्टीचा कैवारी
तुझ्या मायेत मखमल न्यारी
तुझ ऋणी र आम्ही देवा
तु आमच पालन करी
माझ्या गणराया मोरया
तुझ्या आलो मी चरणावरी
माझ्या नशिवाची घागर
देवा तुझ्या पायी सांडुदे
सुख दुःखाच साकडं
मला तुला राया सांगूदे….
सप्त जन्मापरी मी तुझा
नाथा झालोय सेवेकरी
माझ्या गणराया मोरया
तुझ्या आलो मी चरणावरी
पाखरू झेप घेण्या शिकतया
देई प्रयत्नाला तु यश
तूच भुई नी सागर किनारा
तूच अखंड हा आकाश
तूच भुकेल्या आशिलाला
देई पोटभर भाकरी
माझ्या गणराया मोरया
तुझ्या आलो मी चरणावरी