रे गणराया नमितो मी आधी तुला

  • Re Ganraya Namito Mi Aadhi Tula

रे गणराया !
नमितो मी आधी तुला ।।धृ0।।

सर्व अंगि शेंदूर चर्चुनी,
बेंती हिरा माखला ।।१।।
रे गणराया !
नमितो मी आधी तुला

मुकुट मस्तकी, सोंड विराजे,
करी मोदक-माला ।।२।।
रे गणराया !
नमितो मी आधी तुला

तुकड्यादास शरण ज्या गेला,
चरणी ठाव दिला ।।३।।
रे गणराया !
नमितो मी आधी तुला

मिलते-जुलते भजन...