ॐ कार स्वरूपा सद्गुरू समर्था
Omkar Swarupa Sadguru Samartha
ॐ कार स्वरूपा सद्गुरू समर्था
अनाथांच्या नाथा तुझ नमो….. || धृ ||
नमो मायबापा गुरुकृपाधना,
तोडीया बंधना मायामोहा
मोहजाळ माझे कोण नीरशील
तुझविण दयाळा सद्गुरुराया….. || १ ||
ॐ कार स्वरूपा सद्गुरू समर्था
अनाथांच्या नाथा तुझ नमो…..
सद्गुरुराया माझा आनंदसागर,
त्रैलोक्य आधार गुरुराव
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश
ज्यापुढे उदास चंद्ररवी, रवी, शशी,
अग्नी, नेणती रूप
स्वप्रकाश रुपा नेणे वेद…. || २ ||
ॐ कार स्वरूपा सद्गुरू समर्था
अनाथांच्या नाथा तुझ नमो…..
एका जनार्दनी गुरुपरब्रम्,
तयाचे पै सदामुखी || ३ ||
ॐ कार स्वरूपा सद्गुरू समर्था
अनाथांच्या नाथा तुझ नमो….. || धृ ||