मोरया तुझ्या नामाचा गजर
मोरया तुझ्या नामाचा गजर लिरिक्स
मोरया तुझ्या नामाचा गजर
चित्स्वरूपम , विश्वरूपम, दिव्यज्ञानम, गणेशा
प्रथम पुजम, गजकर्णक: शुभकार्येशु, गणेशा
एकदंताय, गोजेप्रदाय, वेदगर्भा गणेशा
निराकार, ओंकार, धुम्रवर्ना गणेशा
आधी तू, अनंत तू, तू गणनायका
हे शिवसुता, गिरजात्मजा तू गुणनायका
चराचरात वास तुझा, रे शरण तुला
तुझ्याविना अपूर्ण सारा त्रिलोक गणेशा
जिथे तिथे दिसते तुझे रूप मनोहर
दाही दिशात घुमतो तुझ्या नामाचा गजर
मोरया, मोरया, तुझ्या नामाचा गजर
सृष्टीचा मुलारंभ, आधार तू
सर्वेश्वरा पंचतत्त्वात तू
विद्याधिशा, तू कलाधिपती
विश्वाचा परमेश्वर, हेरंब तू
सुर-ताला संगे गातो तुझे गुणगान
तुझ्या भक्तीमध्ये तल्लीन रे तन-मन
नादाऊनी रंगला उजळला आसमंत
दाही दिशात घुमतो तुझ्या नामाचा गजर
मोरया, मोरया, तुझ्या नामाचा गजर
करुणा कृपा, दया, लंबोदरा तुझं अंतरी
विघ्नांचे तिमिर, एका क्षणात हसरी
ठेवितो मस्तक, नमन रे तुझे चरणी
आशिष द्या, दृष्टी राहो, सदा बाप्पा मजवरी
करुणा, कृपा, देवा, तुझं अंतरी
विघ्नांचे तिमिर तू हसरी
ठेवितो मस्तक, मी चरणावरी
आशिष राहो, सदा मजवरी
हे गन दैवता,दाता,भ्राता,तू सखा रे
हे सिद्धेश्वरा,दे आकार या पामरा रे
हरवल्या भक्ताला, तु दाव पैलतीर
दाही दिशात घुमतो तुझ्या नामाचा गजर
मोरया, मोरया, तुझ्या नामाचा गजर
ॐ आवाहन न जानामि, नैव जानामि पूजनम
विसर्जन न जानामि, क्षमस्व प्रमेश्वर
मंत्रहिन् क्रियाहीन, भक्तीहिन् सुरेश्वर !
यत्पूजितं मया देव ! परिपूर्ण तदस्तु में