गणराया लवकर येई

  • Ganaraya Lavakar Yeyi

गणराया लवकर येई ।
भेटी सकळांसी देई ॥१॥
गणराया…….

अंगी शेंदुराची उटी ।
केशर कस्तुरी लल्लाटी ॥2॥
गणराया…….

पायी घागुऱ्या वाजती।
नाचत आले गणपती ॥3॥
गणराया…….

अवघ्या गणाचा गणपती ।
हाती मोदकाची वाटी ॥4॥
गणराया…….

तुका म्हणे शोधून पाहे ।
विठ्ठल गणपती दुजा नोहे ॥5॥
गणराया…….

मिलते-जुलते भजन...