रांझण गावाला महा गणपति नान्दला
रांझण गावाला गावाला
महा गणपति नान्दला
चला पहाटे पहाटे
देव केव्हा चा जागला
त्रिपुरासुर ऐसा कोपे
शिवशंकराला टोपे
पुत्र गणपति गणपति
रण जायाला धावला
रांझण गावाला गावाला
महा गणपति नान्दला
चला पहाटे पहाटे
देव केव्हा चा जागला
त्रिपुराचा नाश केला
गण येते चि राहिला
दहा सोंडाचा सोंडाचा
विसा भुजांचा शोभला
रांझण गावाला गावाला
महा गणपति नान्दला
चला पहाटे पहाटे
देव केव्हा चा जागला