तूच सुखाचा हाय ठेवा
मोरया रे बाप्पा मोरया रे
मोरया रे बाप्पा मोरया रे
तुझ्या नामात हाय गोडवा
तूच सुखाचा हाय ठेवा,
माझ्या गणपती देवा
तूच सुखाचा हाय ठेवा,
माझ्या गणपती देवा
ढोल ताशाच्या ठेक्या वरती,
भक्त झाले हो सारे धुंद
आली घराला मंगलमूर्त,
आज आनंदी हो आनंद
माझ्या देवांन माझ्या गणान,
पितांबर ल्याले नवा
तूच सुखाचा हाय ठेवा
माझ्या गणपती देवा
ते सुरवर मुनिवर गाती,
देवा अथांग तुझी ही कीर्ती
तू देवाचा देव गणपती,
करी मनोकामना पूर्ती
माझ्या गणाच माझ्या देवाच,
मंगलमय रूप पहावा
तूच सुखाचा हाय ठेवा,
माझ्या गणपती देवा
हिरे जडीत मुकुट डोई,
वाजे रुणझुण घुंगुरू पायी
संगे पुजली ती गौराई,
काय सांगू तिची नवलाई
महती लिहायला महती लिहायला,
त्या कैलासाला बोलवा
तूच सुखाचा हाय ठेवा,
माझ्या गणपती देवा